vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, वाचकांसाठी चांगल्या सेवा व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) यांना “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतात.या पुरस्कारांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये व 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

सन 2024-25 या वर्षासाठीचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. संचालक श्री. अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

राजेगाव येथील शेतकरी उगले यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठींबा…

काटगाव येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण