vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कार्यकारी अभियंत्याला शिवसैनिकांचा घेराव वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर कार्यकारी अभियंत्यांना विजेच्या प्रश्नांवरून घेराव स्मार्ट मीटर बसविण्याची योजना खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी.

कार्यकारी अभियंत्याला शिवसैनिकांचा घेराव वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर कार्यकारी अभियंत्यांना विजेच्या प्रश्नांवरून घेराव स्मार्ट मीटर बसविण्याची योजना खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी

जालना,(प्रतिनिधी)-महावितरणच्या वतीने ग्राहकावर लादलेलाअन्यायकारक अधिकार व वाढीव देयके तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जालना शहरातील मस्तगड येथील महावितरणच्याकार्यालयात जाऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्शनवार यांना

घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी करत महावितरणच्या धोरणाचा तीव्र निषेध करूनसदरील अधिभार तातडीने मागे घेण्याची जोरदार मागणी केली.यावेळी उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलमेटकर,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश राऊत, जि.प.माजी सदस्यबबनराव खरात, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,दुर्गेशकाठोटीवाले, विधानसभा संघटक दीपक रनणवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनी म. यांचेकडून आकारण्यात येणार्‍या वीज देयकांमध्ये सामान्य घरगुतीग्राहकांवर असह्य आर्थिक भार टाकण्यात येत असल्याची बाब सर्वत्रनिदर्शनास येत आहे. मासिक ९६ युनिट इतका अल्प वापर असूनही देयकाची रक्कमसुमारे रुपये ८५४ इतकी होत आहे. त्यामध्ये निव्वळ उर्जा शुल्क अंदाजेरुपये ४०० असून उर्वरित रक्कम विविध अधिभार व स्थिर शुल्काच्या स्वरूपात आकारली जाते.उर्जा शुल्क, वहन शुल्क, प्रसारण शुल्क, व्हिलींग शुल्क, इंधन समायोजनअधिभार, स्थिर शुल्क तसेच विविध कर व अधिभार यांच्या आकारणीमुळे सामान्यग्राहकांवर अतिरिक्त भार येत आहे. औद्योगिक व व्यापारी ग्राहकांवरलावावयाचे अधिभार प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांवर लादले जात आहे.विशेषत्वाने निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे की, स्मार्ट मीटर बसविण्याचीयोजना प्रत्यक्षात खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी राबविण्यात आलेली असून,त्यातून सामान्य नागरिकांना बिल वाढणे, चुकीचे रीडिंग, आणि ग्राहक सेवेतहोणार्‍या त्रुटी यामुळे अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जावी व तातडीने स्वतंत्र चौकशी करणेआवश्यक आहे. तसेच राज्यातील ग्राहकांच्या हितरक्षणाकरिता शासनाने तातडीनेपुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.घरगुती ग्राहकांच्या वीज देयकातील सर्व अधिभारांचे पारदर्शक व तपशीलवारस्पष्टीकरण सार्वजनिक करावे. शंभर युनिटपर्यंत वापरणार्‍या घरगुतीग्राहकांसाठी अधिभार व स्थिर शुल्कावर मर्यादा घालून संरक्षित दर लागूकरावेत. स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना योग्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत. औद्योगिक व व्यावसायिकग्राहकांचे अधिभार घरगुती ग्राहकांवर टाकले जाणार नाहीत, याबाबत स्पष्टनिर्देश द्यावेत. विलंबाने देयक भरल्यास घरगुती ग्राहकांचे विद्युतकनेक्शन तात्काळ तोडण्याऐवजी किमान पंधरा दिवसांची मुदत द्यावी.दरवाढनिश्चित करताना विद्युत निर्मिती खर्च, इंधन खर्च व वाहतूक खर्चाचातपशीलवार हिशेब घेऊनच निर्णय घ्यावा. इंधन समायोजन अधिभार व इतरआकारणीच्या माध्यमातून जादा वसुल झाल्यास ती रक्कम पुढील देयकात कपातकरून ग्राहकांना परत करावी. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्यासार्वजनिक सुनावणीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील ग्राहक प्रतिनिधींनाअनिवार्यपणे सामावून घेण्यात यावे.कृषी ग्राहकांना अधिभारातून सवलत देऊन त्यांच्या कनेक्शन तोडण्यापूर्वीकिमान तीस दिवसांची मुदत देण्यात यावी. स्मार्ट मीटर भारतीय मानक ब्युरोप्रमाणित असल्याची खात्री करून, चुकीच्या देयकाबाबत ग्राहकांना तातडीनेभरपाई मिळण्याची तरतूद करावी.गरीब व मध्यमवर्गीय घरांकरिता विशेष सवलतीचेदरपत्रक लागू करावे. गणेशोत्सव कालावधीत नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असतेतसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते त्यामुळे विद्युत पुरवठाअखंडित सुरु राहील, याची काळजी घ्यावी याप्रमे मागण्या करून त्या तातडीनेसोडविण्याची मागणी केली.उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, प्रभाकर घडलिंग, तालुका संघटक बाबुरावकायंदे, विभाग प्रमुख पंडितराव क्षीरसागर, बळीराम ढवळे, सुरेशराववाघमारे, जनार्दन गिराम, तुळशीदास काळे, विष्णुपंत गिराम, उपशहर प्रमुखअजय रोडीये, युवासेना उपशहरप्रमुख किरण तुम्मा, सोनाजी खांडेभराड, जीवनखंडागळे, गणेश लाहोटी, इम्तियाज, फुरकन सय्यद, अब्दुल नईम, सुनील तोडकर, अर्जुन शेवाळे, विठ्ठल पाऊलबुद्धे, आसाराम वाघमारे, किसन घडलिंग,तुळजाराम माधवले, चिंन्नूलाल माधवले, महादेव कावळे, श्याम कुलथे,तुकाराम भुतेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

०००००००००००

संबंधित पोस्ट

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात ‘ #महाभूसंपादनपोर्टल ’चा #शुभारंभ‘महाभूसंपादन पोर्टल’मधून #ऑनलाईन पद्धतीने होणार #भूसंपादन प्रक्रिया

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट महादेवा ठाणे जिल्हा निवड चाचण्या; प्रचंड उत्साह आणि फुटबॉल प्रतिभेचा आविष्कार*

vishwatmaklokswamivarta