vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

जिल्हा प्रतिनिधी. बुलढाणा-

अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव बुलढाणा यांच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन आणि महोत्सव महोत्सवानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प.पू. आचार्य श्री लोणारकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा बुलढाणा श्री पंचकृष्ण मंदिर अजिंठा रोड बुलढाणा येथून धाड नाका मार्गे काढण्यात आली. यावेळी भव्य रथामध्ये श्री चक्रधर स्वामींची मूर्ती विराजमान होती. दरम्यान यावेळी पालखीचेही आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, दिंडीतील लेझीम पथक आणि टाळ मृदंग असलेली ही शोभायात्रा बस स्टँड मार्गावरून संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, कारंजा चौक, तहसील चौक, सर्कुलर रोड मार्गे सुरू झाली आणि धाड नाका मार्गे श्री पंचकृष्ण मंदिर, अजिंठा रोड बुलढाणा येथे समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत एक हजार ते पंधराशे महानुभाव पुरुष आणि महिला भाविक पांढरे झेंडे घेऊन सहभागी होऊन फुगडी, टाळमृदुंगाच्या गजरामध्ये पावली खेळण्यात आली

— बॉक्स–

मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत देवतांचे मंगल स्नान, श्रीमद् भागवत गीता पारायण, सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत ध्वजारोहण, स्वागत, दीपप्रज्वलन कार्यक्रम, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानावर प्रबोधन आणि शोभायात्रेत दुपारी २ वाजेपासून सहभागी झालेल्यापैकी उत्कृष्ट भजनी मंडळास व उत्कृष्ट फलकास सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता पंचावतार उपहार आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

–बॉक्स–सदर कार्यक्रमाच्या समारोप उपस्थितीमध्ये चिखलीच्या आ. श्वेताताई महाले. बुलढाणाचे आ. संजय गायकवाड, काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रिसोडचे आ. अमित झनक, मलकापूर आ. चैनसुख संचेती, पदवीधर मतदारसंघाचे आ.धीरजभाऊ लिंगाडे, अचलपूरचे आ. प्रविण तायडे अचलपूर, किरण सरनाईक आ.अमरावती, भाजपाचे बुलडाणाा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, शिवसेना नेता डी.एस. लहाने, शिवसेनेच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके, गोविंदशेठ अग्रवाल, संजय गारूड, माजी आमदार धृपदराव सावळे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक नीलेश तांबे, हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षणसंस्था अमरावती, सहायक वाहतूक अधिक्षक रामकृष्ण पवार, बुलडाणा तहसिलदार कुमरे, पंचकृष्ण पं. मंडळ नाशिकचे बाळासाहेब काठे, बुलडाणा ठाणेदार रवि राठोड, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. वसंतराव चिंचोले बुलढाणा, जिल्हा शल्यचिकित्सक बिरासदार, ओमसिंग राजपूत, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूसारी, डॉ. राजेश्वर उबरहंडे, लक्ष्मीकांत बगाडे पत्रकार, सुनिल तिजारे पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

अष्ट लक्ष्मी*आदि लक्ष्मी

vishwatmaklokswamivarta

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

साधकांसाठी महत्वाचे….

vishwatmaklokswamivarta

दैव किंवा नशीब म्हंणजे काय?🌺*