vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी: बुलढाण्यात पहिल्यांदाच पत्रकारांनी ‘वृत्तेश्वर’ गणेश मंडळाची स्थापना करून विविध उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून येत्या रविवारी पत्रकार भवन परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘वैभव – विशाल’ या नावाने गझल संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज्य शासन पुरस्कार प्राप्त, चित्रपट गीतकार वैभव देशमुख आणि लोकप्रिय गझलकार विशाल मोहिते यांच्या गझल आणि कवितांची ही अवीट मैफिल असणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहून, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 सण – उत्सव सामाजिक एकात्मियतेचे प्रतीक आहे. उत्सव काळात मानवी मूल्यांचा प्रचार आणि प्रसार होत असून, जीवनाला स्तकर्माची दिशाही प्राप्त होते. याच भावनेतून पत्रकार संघातर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एक असलेल्या भजन स्पर्धेची प्रथम फेरी पार पडली. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांची स्पर्धा शनिवार, ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. रविवार, ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस दल आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला आणि निंबध स्पर्धेचे बक्षीस वितरण शहरातील कारंजा चौकस्थित प्रभा हॉल येथे पार पडेल. यानंतर, सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन परिसरात वैभव- विशाल गझल संध्या ही मैफिल रंगणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट