vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे- *ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे* 

भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे- *ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे*

सातारा द प्रतिनिधी- भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्या चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.

शाळेमध्ये भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले आहेत त्याची पाहणी श्री. गोरे यांनी करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने शाळेत राबविलेल्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह उर्जादायी होता.या कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कांचन जगताप, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, संत गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक सूर्यकांत माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवलेचे सरपंच विष्णुपंत कट्टे पाटील, राहुल भोसले यांच्यासह आदी मान्यवर, शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्याचे सातवे निवडणूक आयुक्त म्हणून पदाचा पदभार स्वीकारला.

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन..

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी*

vishwatmaklokswamivarta

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार