vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

सातारा, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४ हजार ५००, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये ६००, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह रुपये २००, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत.

0000

संबंधित पोस्ट

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू …

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ