vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल…

गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल…

सातारा प्रतिनिधी: सातारा शहरामध्ये दि. 5 व 6 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकान्वये दि. 5 सप्टेंबरच्या सकाळी 6 वा. पासून 7 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.

या बदलानुसार राजपथावर कमानी हौद – देवी चौक, मारवाडी चौक- मोती चौकपर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. कमानी हौद ते शेटे चौकपर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद. मोती चौक – एम.एस.ई.बी. ऑफिस समर्थ टॉकिज – राधिका टॉकिज चौक- ऐक्य प्रेस कॉर्नर – बुधवार नाका चौक- गणेश विसर्जन कृत्रीम तलाव कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बँक प्रतापगंज पेठ (काटदरे मसाले दुकान ) – डि.सी.सी. बँक – मोती तळे पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. गोळावा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग हलकी व अवजड वाहनांसाठी बंद राहील.

बोगदा-समर्थ मंदिर ते शाहू चौक हा मार्ग हलके व अवजड वाहनांसाठी (एस.टी.बस सह) वाहनांसाठी बंद राहील, सज्जनगड व कास पठार कडे जाणारी व येणारी सर्व वाहने (एस.टी.बस सह) ही गोडोली नाका, शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, शेंद्र सोनगाव फाटा, बोगदा मार्गे ये जा करतील. मोळाचा ओढाकडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर – राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे एस.टी. स्टॅन्ड कडे येणारी वाहने ही कोटेश्वर मंदिर – शाहुपुरी – मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक मार्गे एस.टी. स्टँडकडे येतील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहु चौक अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावी

 मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे येथे बुधवार नाका जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने शाहूपुरी अथवा पर्यायी मार्गाने घेऊन जावे. कास-यवतेश्वर तसेच सज्जनगड, सोनगाव फाटा मार्गे सातारा शहरात येणाऱ्या वाहनांनी शेंद्रे शिवराज मार्गे सातारा शहरात यावे. बोगदा ते शाहू चौक मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

 सातारा शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुक ही राजवाडा-मौती चौक-देवी चौक-कमानी हौद-शेटे चौक-शनिवार चौक-मोती चौक-राधिका चौक-बुधवार नाका-विसर्जन तळे या मार्गावरुन जाणार असल्याने या मार्गावर चार चाकी व दुचाकी वाहने पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मार्गावर राहणाऱ्या नागरीकांनी आपली वाहने विसर्जन मार्ग सोडुन पर्यायी जागेत पार्क करावीत. वरील सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

विशेष लेख -शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणार प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

कारागृहातील कैद्यांनी चांगले व्यक्तिमत्त्व बनून जीवन जगावे  – कारागृह अधीक्षक विजय कांबळे,सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी “जीवनगाणे गातच जावे”

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta