vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन

गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा.

नवी दिल्ली, प्रतिनिधी : महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी सदनातील ‘ श्री’ दर्शन घेतले. या वेळी निवासी आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले. स्वयंसहायता गटातील कारागिरांनी तयार केलेली पारंपरिक शॉल तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने त्यांना भेट म्हणून देण्यात आली. वर्मा यांनी हे उत्पादने पाहून समाधान व्यक्त केले आणि स्वयंसहायता गटाच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी उपमुख्यमंत्री वर्मा यांनी दिल्ली सरकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यमुना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने यंदा गणेश विसर्जनासाठी तब्बल ८५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना इको-फ्रेंडली विसर्जनाची सोय उपलब्ध झाली असून, नदीच्या संरक्षणास मोठी मदत होईल, असे श्री वर्मा म्हणाले.

आज महाराष्ट्र सदनात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड येथील गायक धनंजय जोशी यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. श्री वर्मा यांनी या सोहळ्याचा आनंद घेत गणेशोत्सवाचा उत्साह, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले

000

संबंधित पोस्ट

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…