vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन..

विदेश प्रतिनिधी-मैत्री आणि समुद्री भागीदारीचे दृढ प्रदर्शन करत, स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका आयएनएस कदमतला 4 सप्टेंबर 2025 रोजी पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित फिरत्या ताफ्याचे नेतृत्व करण्याचा मान प्राप्त झाला.

या औपचारिक ताफ्याच्या रांगेत आयएनएस कदमत प्रमुख नौका म्हणून सहभागी झाली होती, त्यासोबत एफएनएस ऑगस्ट बेनेबिग, एचएमपीएनजीएस गिल्बर्ट तोरोपो, एचएमपीएनजीएस टेड डिरो, एचएमपीएनजीएस रोकस लोकिनाप, व्हीओईए नकाहाऊ कौला आणि एचएमएएस चिल्डर्स या युद्धनौका सहभागी झाल्या.

या संचलनाचे आयोजन पोर्ट मॉर्स्बी बंदरात करण्यात आले होते. या संचलनात आयएनएस कदमतने अधिकारी संचलन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत कार्यक्रमाशी संबंधित विविध तांत्रिक आणि समन्वयात्मक आव्हाने अत्यंत कुशलतेने पेलली. या कार्यक्रमाची तयारी १ सप्टेंबरपासून सुरू झाली होती आणि सर्व नौकांना स्पष्ट आदेश आणि सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले होते.

त्यानंतर, बंदरात केलेल्या सखोल तयारीच्या बळावर, पाच देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात युद्धनौका 600 यार्ड अंतर राखून एकाच रांगेत अचूकपणे प्रवास करत पूर्वनियोजित वेळी आपल्या सलामीच्या स्थानावर पोहोचल्या. कार्यक्रमानंतर सर्व युद्धनौका सुरक्षितपणे आपापल्या स्थानावर थांबल्यावर या संचलनाचा यशस्वी समारोप झाला.

या कार्यवाहीतून भारतीय नौदलाची बहुराष्ट्रीय वातावरणात कार्य करण्याची क्षमता अधोरेखित झाली असून, ते एक उच्च प्रशिक्षित आणि व्यावसायिक सैन्यदल असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातल्या समविचारी नौदलांमधील वाढती परस्पर कार्यक्षमता आणि प्राधान्यक्रम असलेला सुरक्षा भागीदार म्हणून भारतीय नौदलाची उंचावलेली प्रतिष्ठा यावरही या प्रसंगाने शिक्कामोर्तब केले.

संबंधित पोस्ट

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ

vishwatmaklokswamivarta