vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी,कोयना धरणातून आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  49300 क्युसेक्स पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे. सध्या कोयना धरणातून सुरु आहे. 33 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे . धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सध्या धरणात 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे. हा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज 29 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता धरणाची पाणी पातळी 2152 फूट 9  इंच  झाली असून धरणामध्ये 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाची वक्रद्वारे  24 जुलै 2021 पासून 5 फुट 6 इंच वर स्थिर आहेत. सध्या सांडवा आणि पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 33045 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज  धरणाची वक्रद्वारे एकूण 9 फुट उचलून सांडवा आणि पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 49300 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असे कोयना धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले.

संबंधित पोस्ट

कर्नाटक काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आज महाराष्ट्रात सांगली दौऱ्यावर…

vishwatmaklokswamivarta

पनवेल आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH46DG’ नवीन मालिका आकर्षक क्रमांकांसाठी 17 फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार..

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरसभेत प्राणघातक हल्ला झाला आहे.शिंजो आबे यांच्या वरील हल्ल्यांचे व्हिडिओज आले समोर; हल्लेखोर देखील ताब्यात

विद्यार्थ्यांची विशेष बातमी,  नागपूर विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश, निकालाची प्रतीक्षा नको, सुरू करा पुढले वर्ग.

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

vishwatmaklokswamivarta