
मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि पदोन्नती आरक्षणासाठी नांदेड मध्ये पहिली राज्यस्तरीय आरक्षण परिषद…
मुंबई प्रतिनिधी मागील सहा महिन्यापासून मराठा आरक्षण ओबीसी राजकीय आरक्षण आणि मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण यातील समाजघटकांच्या आरक्षणाला विषयामुळे संपूर्ण महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे या तिन्ही आरक्षण विषयासंदर्भात येत्या 31 जुलै रोजी नागो रावजी मंगल कार्यालय नांदेड येथे सकाळी अकरा वाजता पहिली राज्यस्तरीय आरक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती विजाभज इमाव व विमाप्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री भारत वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षापासून सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्टया वंचितराहिलेल्या समाज घटकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला, अनु. जाती, जमाती, ओबीसीसह इतर समाज घटकांची उन्नती होत असतनाच कधी राजकीय दबाय तर कधी उच्च जातीय दबावामुळेआरक्षणाच्या मुलभूत हक्कावर नेहमीच सरकारने छेडछाड केली व त्याचा परिणाम आरक्षण लाभार्थीना भोगावा लागत आहे. मागील सहा महिन्यापासून मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण व पदोन्नतीआरक्षण या तीन समाज घटकांच्या आरक्षण विषयामूळे संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण व पदोन्नती आरक्षण या विषयावर त्या त्या समाजघटकांकडून मोर्चे, रस्ता रोको, उपोषण, धरणे अशी विविध आंदोलने सुरु असून संपूर्ण राज्यात सगळीकडे विचारविनिमय करण्यासाठी बैठका आयोजित केल्या जात आहेत.उपरोक्त संघटनेने अनु.जाती / जमाती/ विजा-भज / इ.मा.व./ वि.मा.प्र. या मागासवर्गीयांच्यापदोशतीमधील आरक्षण पूर्ववत सुरु व्हावे म्हणून संपूर्ण राज्यात आंदोलने व धरणे धरुन सरकारचे लक्ष वेधूनघेतले आहे. तसच संविधानात्मक मार्गाने सुध्दा संघटना न्यायालयात लढत आहे. या लढ्याला राज्यस्तरीयव्यापक स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून संघटनेच्या वतीने पहिली आरक्षण परिषद नांदेड येथे आयोजित केली असून
अशा आरक्षण परिषदा सहा महसूली विभागात आयोजित करण्यात येणार आहेत.
पहिली राज्यस्तरीय आरक्षण परिषद दि.३१ जुलै, २०२१ रोजी नागोरावजी मंगल कार्यालय, नांदेड
येथे सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आली असून सदर राज्यस्तरीय आरक्षण परिषदेच्या उद्घाटन
कार्यक्रमास मा.ना.डॉ.नितीन राऊत, मंत्री (उर्जा) ,मा.ना.संजय बनसोडे (राज्यमंत्री) प्रमुख मार्गदर्शक म्हणून
उपस्थित राहणार आहेत. तसेच मा.दिनेश डिंगळे, सह सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
आणि मा.काकासाहेब खंबाळकर, संघटनेचे मुख्य सल्लागार,मा.सुरेशदादा गायकवाड, आंबेडकरी चळवळी
अभ्यासक व विचारवंत, मा.राजाराम खरात, अध्यक्ष, बुध्दीस्ट मिशन ऑफ इंडिया, मा.दादाभाऊ अभंगा
अध्यक्ष, भीमा कोरेगांव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती (रजि.) व मा.रघुनाथ महाले, प्रदेश अध्यक्ष
अखील भारतीय ओ.बी.सी.महासभा हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेस संघटनेची केंद्रीय कार्यकारणी/विभागीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष त
सर्व पदाधिकारी व सदस्य यांची कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन उपस्थिती असणार आहे.
भास्त वानखेडे
अध्यक्ष, मंत्रालय तथा महाराष्ट्र



