vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

राज्य प्रतिनिधी शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तालुकास्तरिय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला सहपालकमंत्री ना. संजय सावकारे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पदाधिकारी आणि तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या, देशाला समृद्ध करायचे असेल तर त्याची सुरुवात आपल्या ग्रामपंचायतपासून झाली पाहिजेत. या अभियानात लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही. या अभियानांतर्गत राज्य शासनाने ग्रामपंचायत ते राज्यस्तरापर्यंत 15 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतची बक्षिसे जाहीर केली आहे. या रकमेतून ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करुन नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य सेवक यांसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्याने कसोशीने प्रयत्न करुन हा अभियान राबवावा. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ही संधी आहे. त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ गावकरी, सरपंच, ग्रामसेवकांनी करुन घ्यावा, ही संधी आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव हरित, स्वच्छ आणि लोकाभिमूख करायचे आहे. ग्रामपंचायत ते संसद अशी या अभियानाची संकल्पना आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याची संधी असून लोकसहभागाने एकत्रित येवून अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे म्हणाले, केंद्राच्या धर्तीवर राज्यात हे अभियान राबविले जात आहे. महाराष्ट्राच्या अनेक योजना देशपातळीवर स्वीकारल्या गेल्या. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. आज तरुण शहरांकडे जात आहेत. त्याचे कारण सोयीसुविधा हा आहे. या स

संबंधित पोस्ट

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस