vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, द प्रतिनिधी  : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश • जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त • महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित,महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न

बुलढाण्यातील दुर्दैवी धक्कादायक घटना- आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं…

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..