vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

अहिल्यानगर, प्रतिनिधी– जिल्ह्यात  सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

बचावकार्याची ठळक माहिती,अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता.

पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली.

जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पूरामधून वाचविण्यात आले.मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून पूरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta