vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

राज्य प्रतिनिधी : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. याप्रकरणी श्यामकानू महंता हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार: ‘या अली’ या ब्लॉकबस्टर गाण्याचा गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान मृत्यू झाला. तो 52 वर्षांचा होता. झुबीनच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककला पसरली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी घोषणा केली की, झुबीनच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी केली जाईल. राज्य सरकारने आसाम पोलिसांना या घटनेसंदर्भात दाखल केलेल्या सर्व एफआयआर सविस्तर चौकशीसाठी सीआयडीकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान झुबीनच्या निधनानंतर श्यामकानू महंता आणि सिद्धार्थ शर्मा ही दोन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. या दोघांविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. श्यामकानू महंता हे नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक होते, तर सिद्धार्थ शर्मा हे झुबीनचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

झुबीनच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे श्यामकानूवर प्रचंड टीका केली जातेय. श्यामकानू हे आसामचे असून ते उद्योजक आहेत. ट्रेंड एमएमएस या नॉन प्रॉफिट ट्रस्टचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2023 मध्ये त्यांनी दिल्लीत नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हल सुरू केला. त्यानंतर ते हा फेस्टिव्हल बँकाँकला घेऊन गेले. सिंगापूरला होणाऱ्या चौथ्या ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे ते आयोजक होते. याच फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी झुबीन सिंगापूरला गेला होता.

आसामच्या या गायकाची दुःखद बातमी कानावर येताच अनेकांच्या भावना दाटून आल्या. १९९५ मध्ये गर्ग बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आला जेथे त्याने आपला पहिला इंडिपॉप एकल अल्बम ‘चांदनी रात’ सुरु केला. नंतर, त्याने काही हिंदी अल्बम आणि रीमिक्स गाणी रेकॉर्ड केली ज्यात ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘यही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000), यांचा समावेश आहे. त्याने ‘गद्दार’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजा के रखना’ (1998), ‘फिजा’ (2000), ‘कांटे’ (2002) या चित्रपटातील गाणीही केली.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात १७४ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती !शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्ला आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील