vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

 

बुलडाणा, प्रतिनिधी): प्रत्येक वर्षी 28 सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 28 सप्टेंबर हा दिवस रविवारी सुट्टीचा असल्याने, शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी “माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात येणार आहे.

शासन निर्णय दि. 20 सप्टेंबर 2008 नुसार माहिती अधिकार दिन साजरा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करावा, तसेच या निमित्ताने सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती होणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार यंदाचा माहिती अधिकार दिन सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हात साजरा करण्यात येणार आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी असे आवाहन प्रसिद्धीपत्रकांवर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जामिया इस्लामिया इशातूल उलूम संस्थेतील परकीय नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी- गृहराज्यमंत्री (ग्रामीण), डॉ. पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

बारामती रेल्वे स्थानकाला आधुनिकतेची नवी ओळख!

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta