vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

जालना द प्रतिनिधी :- खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील ब्राम्हण, बनिया, मारवाडी ठाकूर, गुजराती, यलमार, जाट, सिंधी, राजपुत, कोमटी, सेनगुणथर, त्यागी, पटेल, बंगाली, पाटीदार, नायडू, नायर, एयांगर, कायस्त, कामा, राजपुरोहित आदी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्ह्यात विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी केंद्र अमृत पुणे व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्याचे नियोजित आहे. यामध्ये अमृत क्षमता बांधणीचे 6 दिवसीय प्रशिक्षण, 18 दिवसीय अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, 21 दिवसीय अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि एक महिन्याचे तांत्रिक अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज आयोजक दिलीप शिलवंत मो. 8087283065 यांच्याशी किंवा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याथकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत..

vishwatmaklokswamivarta