vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने तसेच जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशन, जालना यांच्या तांत्रीक सहकार्याने आयोजीत जिल्हास्तर शालेय सेपाक टाकरा क्रीडा स्पर्धा 2025 – 26 जिल्हा क्रीडा संकुल जालना याठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.

स्पर्धेच्या उद्घाटीका म्हणुन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती मंगलाताई पाटील यांची उपस्थिती होती, आपल्या उद्घाटनपर भाषणात श्रीमती पाटील बोलत होत्या, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सेपाक टाकरा हा अत्यंत चांगला क्रीडा प्रकार असुन जालना जिल्ह्यामध्ये या खेळाचा म्हणावा तसा प्रसार व प्रसार झालेला नाही, परंतु आपण जातीने या खेळात लक्ष घालुन जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये या खेळाचे खेळाडु निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, केवळ खेळाडु निर्माण करून थांबणार नाही तर पक्ष प्रमुख अजित दादा पवार, प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण व पक्ष निरीक्षक श्रीमती वैद्य ताई यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जालना जिल्ह्याचे खेळाडु राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवीण्याचे काम आपण करणार आहोत असे ही त्यांनी यावेळी जाहिर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रेल्वे युनीयनचे सचिव शेख जावेद, सेपाक टाकरा असोसिएशनचे संस्थापक सचिव शेख चाँद पी.जे., असोिएशनच्या पदाधिकारी श्रीमती शेख महेजबीन, क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शेख जावेद यांनीही खेळाडुंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत जालना, परतुर, मंठा, घनसावंगी या तालुक्यातुन मुलांमुलींच्या तिस संघानी सहभाग नोंदवीला. स्पर्धेत पंच म्हणुन अमोल काटकर, संतोष वाघ, शेख समीर, सोहेल खान, संकेत रोजेकर आदिंनी काम पाहीले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लांडगे सर, उमेशचंद्र खंदारकर, मोहम्मद यासीन, अमोल सोलाट, जाधव सर, घोष सर, शुभम पवार, रियाज सर, योगीता मॅडम, गायकवाड मॅडम आदिंनी सहकार्य केले.

स्पर्धेचा अंतीम निकाल पुढील प्रमाणे आहे. 14 वर्षाआतील मुले – प्रथम – ऋषी विद्या एजुकेशनल स्कुल, जालना, द्वितीय – जिल्हा परीषद प्रशाला, नेर ता. जि. जालना. 14 वर्षाआतील मुली – प्रथम – जिल्हा परिषद प्राथमीक शाळा, चापडगाव ता. घनसावंगी, द्वितीय – लेट श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लीश स्कुल, जालना. 17 वर्षाआतील मुले – प्रथम – ऋषी विद्या एजुकेशनल स्कुल, जालना द्वितीय – एम.आर. डी.ए. स्कुल जालना. 17 वर्षाआतील मुली – प्रथम – ऋषी विद्या एजुकेशनल स्कुल, जालना द्वितीय – लेट श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लीश स्कुल, जालना. 19 वर्षाआतील मुले – प्रथम – ऋषी विद्या एजुकेशनल स्कुल, जालना द्वितीय – जिल्हा परीषद प्रशाला, नेर ता.जि. जालना. 19 वर्षाआतील मुली – प्रथम – लेट श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लीश स्कुल, जालना

संबंधित पोस्ट

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज#लोकसभानिवडणूक२०२४#उत्सवनिवडणूकीचाअभिमानदेशाचा

पश्चिम बंगाल भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीने पक्षाला केला रामराम

vishwatmaklokswamivarta

शेतमजूर युनियन लालबावटा यांचा विधवा व निराधार महिला यांच्या मागण्या साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चा मोर्चा …

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta