vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

 राज्य प्रतिनिधी    पणजी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी, गोवा येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

      या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्री. नारायण नाडकर्णी, श्री. मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते.

      या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताना भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय; सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती; सांस्कृतिक कार्यक्रम; लोककला आदींची चित्रे प्रातिनिधिक चित्रे ठेवण्यात आली आहेत. पुढे कार्यक्रमाच्या दृष्टीने वेळोवेळी अधिकची माहिती या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.श्री. चेतन राजहंस,प्रवक्ते, सनातन संस्था…

संबंधित पोस्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

अ‍ॅड. दिपक नाईक यांची राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती..

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार