vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार

सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार

राज्य प्रतिनिधी-अहिल्यानगर, सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आहेत. अतिक्रमण करणाऱ्या वीटभट्ट्यांसह कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, नदीचे नैसर्गिक स्वरूप जपून नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक जागा विकसित केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांत नदीच्या भोवताली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने नदीचे पात्र शिल्लक राहिलेले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून, पहिल्या टप्प्यात ३ किलोमीटरपर्यंतचे रुंदीकरण व अतिक्रमण काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता नव्याने महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनातून आणि जलसंपदा खात्याकडून निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण केले जाईल. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण १४-१५ किलोमीटर नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर केले जाणार आहे

शहरातील अनेक नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणामुळे थांबले असून याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली आहे. हे नाले प्रवाही व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाईल.

महानगरपालिकेचे सांडपाणी १०० टक्के प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडले गेले पाहिजे. अन्यथा नदी स्वच्छ करूनही उपयोग होणार नाही. यासाठी सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता कमी असल्यास, महापालिकेला आवश्यक त्या सुविधा आणि वाढीव प्रकल्पासाठी स्वतः तरतूद करू, अशी ग्वाहीदेखील पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिली.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सीना नदी हद्द निश्चिती, अतिक्रमण हटविणे, रुंदीकरण तसेच संवर्धनासाठी प्रस्तावित कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

#सीनानदीसंवर्धन #RiverRejuvenation2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर परिसरात होणार भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग