vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठीच्या पदभरतीची लेखी परीक्षा दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. जालना शहर परिसरातील एकुण 24 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. तरी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेच्या 24 उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनी क्षेपके बंद ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाच्या अंमलबजासाठी नोटीस देण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. आदेश दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध

पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अनामलाई आणि तेजस्वी सूर्या या तरुण सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रविवारचा आठवडी बाजार रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार