vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रविवारचा आठवडी बाजार रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रविवारचा आठवडी बाजार रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन सोहळा दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विविध शाळांची प्रभातफेरी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच कार्यक्रमासाठी स्त्री, पुरुष व लहान मुलांचा जमाव असतो. रविवार (दि.26 जानेवारी) हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बुलढाणा शहराच्या मुख्य मार्गावर, रस्त्यावर आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे या ठिकाणी गर्दी निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 5 अन्वये कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून बुलढाणा शहरामध्ये रविवार दि. 26 जानेवारी रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत असून आठवडी बाजार पुढील दिवशी भरण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे. 00000000

संबंधित पोस्ट

पलूस नवोदय विद्यालयात प्रवेश अर्जासाठी 29 जुलैची मुदत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अरुणोदय वॉकर्स चा 32 वे स्नेहसंमेलन बांद्राच्या एमआयजी मध्ये उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

एसटी आगारात दर बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” साजरा होणार- प्रवासी आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…