vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू,सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

नागपूर, प्रतिनिधी-

हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज सर्व यंत्रणांच्या पूर्व तयारीचा आढावा घेवून व्यवस्थेबाबत नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या सहआयुक्त वसुमना पंत, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक निवास व्यवस्था आणि वाहन व्यवस्थेसंदर्भात विषय निहाय सविस्तर चर्चा झाली. या दोन्ही व्यवस्थांनी चोख नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या तसेच दूरध्वनी, इंटरनेटची अद्ययावत व्यवस्था उभारण्याच्या सूचना बिदरी यांनी केल्या.अल्पोपहार व भोजन व्यवस्था देताना खाद्य पदार्थांचे प्रमाणीकरण व योग्य नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

सुयोग येथे फक्त पत्रकारांची निवास व्यवस्था तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था वनामती येथे करण्यास याबैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्ताविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता, पाणी पुरवठा व अग्निशमन व्यवस्था,आरोग्य व औषधीय सेवा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात येणारी हिवाळी अधिवेशन संपर्क पुस्तिका आदी विषयांवरही चर्चा झाली.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन,पद्म भूषण पुरस्काराच्या औचित्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात गायक पंकज उधास यांना अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवा – राज्यमंत्री योगेश कदम कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta