vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

*नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  स्वच्छ नवी मुंबई मिशन प्रभावीपणे राबवित असतांना त्यामधील एक महत्वाचा भाग असलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलेले असून बाजारात व सार्वजनिक ठिकाणी होणा-या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या करीता नागरिक व विक्रेते यांच्यामध्ये व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळणा-या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.

           त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत विविध समारंभ, मान्यवरांच्या क्षेत्रभेटी याप्रसंगी आकर्षक कापडी बॅग प्रदान केल्या जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण आणि प्लास्टिक पिशव्यांना नकार व कापडी पिशव्यांचा स्विकार असा संदेश देणा-या या कापडी बॅगच्या माध्यमातून प्लास्टिक प्रतिबंधाचा संदेश सर्वदूर प्रसारित केला जात आहे. याकामी विविध स्वयंसेवी संस्था तसेच व्यावसायिक आणि उद्योगसमुह यांचेही बहुमोल सहकार्य महानगरपालिकेस लाभत आहे.

           अशाच प्रकारे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने 1 हजार आकर्षक कापडी पिशव्या महानगरपालिकेस देण्यात आल्या असून त्याचे वितरण आज अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

          यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. रोहित प्रकाश, मुख्य व्यवस्थापक श्री. रोहन रंगारी, नमुंमपा शाखा व्यवस्थापक श्री. भालचंद्र निमजे, उपव्यवस्थापक श्री. सुहास कलंत्री व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक पर्यावरणशील स्वच्छता अभियान कार्यात स्टेट बँक ऑफ इंडियाला सहभागी होता आले याबद्दल श्री. रोहित प्रकाश यांनी आनंद व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

एसएसबी परीक्षा पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी  उमेदवारांच्या २ मे रोजी मुलाखती…

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय  कार्यालयात आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,बांद्रा रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या झोपड्यांवर बेकायदेशीर बांधकामावर रेल्वे प्रशासनाचा बुलडोजर मोहीम सुरू

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न