vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणीमुंबईत जलवाहतुकीत लवकरच नवीन तंत्रज्ञान क्रांती..

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणीमुंबईत जलवाहतुकीत लवकरच नवीन तंत्रज्ञान क्रांती..

मुंबई, प्रतिनिधी : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई” या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल.या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून नवीन रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात, त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, यामुळे राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.या भेटीदरम्यान कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा मंत्री राणे यांना दिला. महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

०००००

 

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

संबंधित पोस्ट

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

स्वतंत्र सेनानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई गाडेकर यांचे पुत्र ज्येष्ठ नागरिक दिगंबर गाडेकर यांच्या राहत्या घरी श्रद्धा भेट

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत…