vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

 दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

 

सांगली, प्रतिनिधी.) : केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात दि. 27 ऑक्टोबर 2025 ते दि. 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताह कालावधीत ॲन्टी करप्शन ब्युरोची कार्यपध्दती नागरिकांना माहिती व्हावी, जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सर्वत्र दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या सप्ताह कालावधीत प्रामुख्याने भ्रष्‍टाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक संघटना व गाव पातळीवर नागरिकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे विविध शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्यांचे बॅनर्स, स्टीकर्स लावले जाणार आहेत.

भ्रष्टाचार प्रतिबंध विभागामार्फत भ्रष्टाचारी लोकसेवकांविरूद पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात येते.

अपसंपदेची चौकशी – या प्रकारामध्ये नावानिशी किंवा निनावी अर्जावर देखिल चौकशी केली जाते. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमिनी इत्यादी मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असल्याबाबतची तक्रारीवरून चौकशी करण्यात येते. तक्रारीत अशी स्थावर मालमत्ता कोठे आहे याबाबत प्राथमिक व अधिकृत माहिती असणे जरुरीचे आहे.पडताळणी व लाचेचा सापळा – या प्रकारामध्ये तक्रारदाराने प्रत्यक्ष हजर राहून लोकसेवकाविरुद्ध लाचेच्या मागणीबाबत केलेल्या तक्रारीवरून लाचेचा सापळा आयोजित करून भ्रष्ट लोकसेवकास रंगेहाथ पकडून कारवाई केली जाते.

पदाचे दुरुपयोगाबाबतधी चौकशी – या प्रकारामध्ये लोकसेवकाने त्याच्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार करणे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे, अथवा इतरांना तसा वापर करु देणे अशा प्रकारामध्ये संबंधित लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात येते. अशा प्रकारामध्ये भ्रष्टाचार आढळून आल्यास सबंधित खात्याचे प्रभारी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे त्या तक्रारी पाठवितात.: राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानीत मंडळे/ संस्था यांचे अधिकारी/ कर्मचारी, महापालिका / नगरपालिका / जिल्हापरिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इत्यादी लोकसेवकांची भ्रष्टाचारसंबंधी माहिती असल्यास अगर लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, बदाम चौक, पोलीस लाईन शेजारी, सांगली टोल फ्री नंबर 1064, मोबाईल क्रमांक 9404041064, फोन क्रमांक 0233-2373095 येथे किंवा पोलीस उपआयुक्त/ पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, सेंट्रल बिल्डींग, सी बॅरॅक फोन क्रमांक 020-26122134 वर संपर्क साधावा. तसेच मोबाईल अॅप (डाऊनलोड करण्यासाठी www.acbmaharashtra.net) चा वापर करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-*शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;**”मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”*

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार