vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

राज्य प्रतिनिधी –

रामनगर (ता. जालना) — रामनगर येथील ओम मंगल कार्यालयात श्री. शिवादादा शेजुळ यांच्या पुढाकाराने आज दि 26 ऑक्टोबर रोजी दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

यावेळी माजी आमदार कैलाशजी गोरंट्याल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उत्तम अण्णा शेजुळ, ह.भ.प. गणेश महाराज कोल्हे, ह.भ.प. कैलाश महाराज ठोंबरे, तुकाराम पाटील शेजुळ, प्रभाकर शेजुळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, सरचिटणीस सुनील पवार, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, विष्णुबापू डोंगरे, कैलाश उबाळे, दिलीपराव मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभल

माजी आमदार श्री. कैलाशजी गोरंट्याल म्हणाले “सण-उत्सव ही आपल्या सामाजिक जीवनाची ताकद आहे. अशा स्नेहमिलनातून आपला भावनिक बंध दृढ होतो. समाजातील प्रत्येक घटकाने एकात्मतेची भावना जपत विकासाच्या वाटचालीत हातभार लावला पाहिजे. रामनगर येथे शिवादादा शेजुळ यांनी आयोजित केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.”

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले शिवादादा शेजुळ यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे तसेच “दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. हा प्रकाश फक्त दिव्यांमध्ये नसून मनामनात पसरला पाहिजे. आपण सर्वांनी एकमेकांना साथ देत समाज विकासासाठी कटिबद्ध राहिले तर विकास अधिक वेगाने होईल. सर्वांना दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.यावेळी रामनगर व परिसरातील बंधू भगिनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta