vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदतपदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदतपदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा प्रतिनिधी -शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामधील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा व्हीसीद्वारे घेतला. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व प्रांत अधिकारी तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. यासाठी प्रांताधिकारी यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घ्यावी. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील महाविद्यालयांची मदत घ्यावी. तसेच बरेच शिक्षक ही पदवीधर आहेत त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी,अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले

००००

संबंधित पोस्ट

वक्फ बचाव’ परिषद जालन्यात २८ जून रोजीप्रमुख इस्लामी विद्वान व नेते वक्फ कायद्यातील सुधारणांवर भाष्य करणार…

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta