vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याकामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा- पालघर पालकमंत्री गणेश नाईक

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याकामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा- पालघर पालकमंत्री गणेश नाईक

मुंबई, प्रतिनिधी: पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील निवासस्थांनाचे काम लवकरात लवकर पूर्ण यासाठी हा प्रकल्प मुख्यमंत्री वॉर रुममध्ये घेण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले

पालघर जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, सफाळे येथील ग्रामीण रुग्णालय, मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर व पालघरमधील परिचर्या महाविद्यासंदर्भात कामाचा आढावा मंत्री नाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले की, पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा वाढीव खर्चाच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. आदिवासी भागातील बांधवांसाठी हे रुग्णालय उपयुक्त असल्याने तो लवकर पूर्ण करून सुरू करण्यासाठी त्याचा समावेश मुख्यमंत्री वॉररुम प्रकल्पांमध्ये करण्यात यावा. यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तातडीने सादर करावा.

सफाळे येथील ग्रामीण रुग्णालय व मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या बांधकामासाठी आवश्यक तो निधी मिळविण्यात येईल. मात्र, तोपर्यंत उपलब्ध असलेल्या निधीतून काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण‘निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी -डॉ. मनसुख

विविध नागरी सुविधांची व नालेसफाईची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले