vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

 मुंबई, प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २५ टक्के आणि संबंधित महानगरपालिकेकडून २५ टक्के निधी खर्च केला जातो, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री अमित गोरखे, सत्यजित तांबे यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत होत असलेल्या प्रकल्पाबाबत सूचना मांडली होती.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, यापूर्वी मे.प्रॉबिटी सॉफ्ट लि. या संस्थेकडून सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले होते. तसेच मे.टेक ९ सर्व्हिसेस या संस्थेला देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. मात्र हे सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड नसल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मे.अटॉस इंडिया प्रा. लि. यांना हे काम देण्यात आले आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, डिजिटल सिग्नेचर व अत्यंत संरक्षित लॉगिन सुविधा असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकल्पाचे काम मे २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रॉपर्टी टॅक्ससंदर्भात राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की, या नवीन सॉफ्टवेअरच्या साहाय्याने थ्रीडी सर्व्हेद्वारे जवळपास साडेपाच लाख मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी कोल्हापूर महापालिकेला शाहू मिलची जागा देण्यास तत्त्वतः मान्यता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत