vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

*पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

सातारा : प्रतिनिधी शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील महाविद्यालयांची मदत घ्यावी,असे निर्देश यंत्रणांना दिले.

तसेच बरेच शिक्षकही पदवीधर आहेत. त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी. मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

गरजू दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या योजनेचा-लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta