vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

शिर्डी: श्री साईबाबा संस्थानतर्फे तुळशी विवाह सोहळा भक्तिभावानं साजरा.

शिर्डी: श्री साईबाबा संस्थानतर्फे तुळशी विवाह सोहळा भक्तिभावानं साजरा.

 

राज्य प्रतिनिधी -शिर्डी: श्री साईबाबा संस्थानतर्फे तुळशी विवाह सोहळा भक्तिभावानं साजरा,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढीपरंपरेनुसार श्री साईबाबा संस्थानच्या वतीने तुळशी विवाह सोहळा श्री द्वारकामाई मंदिरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते तुळशी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश पूजनाने झाली, त्यानंतर तुळशी-विष्णू विवाह विधी, आरती, नैवेद्य दाखविणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले

या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख श्री. विष्णू थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’*

vishwatmaklokswamivarta

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta

अष्ट लक्ष्मी*आदि लक्ष्मी

vishwatmaklokswamivarta

अडथळे दूर करून, बंध मजबूत करून: महिलांच्या कल्याणासाठी संवाद जागवणारा 10 वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद..

vishwatmaklokswamivarta

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

vishwatmaklokswamivarta

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

vishwatmaklokswamivarta