vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकाचे जालन्यात आगमन;चार दिवस दर्शन व पादुका पूजन सोहळा…

श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकाचे जालन्यात आगमन;चार दिवस दर्शन व पादुका पूजन सोहळा…

अध्यात्मिक वार्ता-

जालना (प्रतिनिधि) : श्री समर्थ रामदास स्वामी मठ, खातगाव, ता. कर्जत येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकाचे आगमन जालन्यात झाले असून दि. २६ मे पर्यंत मुक्काम आहे. या दिवसात समर्थांच्या पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. समर्थांच्या पादुकांचा मुक्काम सीमा शेवलीकर देहेडकरवाडी जालना येथे आहे.

आनंदी- नारायण कृपाण्यास संचलित श्री समर्थ रामदास स्वामी मठ, खातगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील समर्थांच्या पादुकांचे आगमन दि. २२ मे ला जालन्यात झाले. पादुकांचा मुक्काम सीमा शेवलीकर, देहेडकर वाडी यांच्या निवासस्थानी आहे. या चार दिवसात समर्थांच्या पादुकांच्या पूजनाच्या नोंदी झाल्या असून, नोंदलेल्या भक्तांच्या घरोघरी पादुका पूजन व दर्शन कार्यक्रम संपन्न होत आहे. पादुका पूजनास जालन्यातील भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सहा वाजता काकडा आरती नंतर पादूकांना अभिषेक होत असतो व नंतर नोंदणी झालेल्या भक्तांच्या घरी पादुका पूजनासाठी जातात. सायंकाळी उपासना नंतर शेजाआरती होत असते. असा नित्याचा कार्यक्रम असून ज्यांना स्वतःच्या हस्ते स्वतःच्या घरी पादुका पूजनाचा लाभ घ्यायचा त्यांनी आपल्या नोंदणीसाठी सीमा शेलगावकर यांचेकडे संपर्क साधावा.

समर्थ मठाचे अध्यात्मिक अधिष्ठान आबादित ठेवून अध्यात्मिक साधनेबरोबर सामाजिक उपक्रमावरही मठाचा तितकाच भर असतो. या मठात गो पालन, वैदिक शाळा, आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम राबवले जातात. तसेच या मठात दासनवमी, रामनवमी, हनुमानजन्मोत्सव आणि गुरुपौर्णिमा हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर अन्नदान होत असते. समर्थांचे पादुका पूजन, दर्शन व भिक्षेत मिळालेल्या देणगीतून या मठाचे उपक्रम होत असतात. म्हणून या उपक्रमास आपलाही सहभाग लाभावा. यासाठी भक्तांनी पादुका पुजनाची नोंदणी करावी असे मठाच्या विश्वस्तांनी आवाहन केले आहे

0000

संबंधित पोस्ट

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….

निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति-आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

आज देशभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे हनुमान जयंती जन्मोत्सव …

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

*नागा साधूंचे रहस्य**अद्भूत दुनिया काहीही न मागणारे साधू… 40% गायब होतात कुंभात!*

vishwatmaklokswamivarta

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

vishwatmaklokswamivarta