श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त
अध्यात्मिक वार्ता
💥 *हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे -*
श्रीसूक्त हे एक वैदिक सूक्त आहे. वेदमंत्र हे सिद्ध मंत्र आहेत. त्यांच्या ठायी जीवन साधनेची उत्तुंग शक्ती आहे. यासाठी प्रामाणिक इच्छा आणि दुर्दम्य प्रयत्न इतकं पुरेसं आहे. हे सूक्त पंधरा ऋचांचे असून ते ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या अंती परिशिष्ट म्हणून दिलेले आहे. याला खिलसूक्त असे म्हणतात. यास्क व शौनक या आचार्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. या सुक्तावर विद्यारण्य, पृथ्वीधर, श्रीकण्ठ या पंडितांनी भाष्ये, टीका, वृत्ती लिहिल्या आहेत. यावरून श्रीसुक्ताची लोकप्रियता आणि विद्वानमान्यता कळून येते. एक प्रासादिक सूक्त म्हणून प्राचीन काळापासून त्याचा गौरव होत आला आहे. अनेक भाविकांनी श्रीसूक्ताचा जप, पुरश्चरण करून आपले मनोवांछित पूर्ण करून घेतलेले आहे. इतर देवतांची उपासना करून आपण त्यांच्याकडे धन , धान्य,भाग्य मागून घेतो पण या सूक्तात खुद्द लक्ष्मी आईकडेच सर्व कामनांची मागणी करतो.
♦️ या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख *समृद्धी , लक्ष्मी ( पैसा )* असावी ..प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो . त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी *श्रीसूक्त चे पाठ* सांगण्यात आले आहे .
♦️ श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून *5 वेळेस पठण* केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते .
♦️कमळकाकडी च्या जपमाळेवर 11 वेळेस श्रीसूक्त पठण करतांना *कुंकुवाचे अर्चन* करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल .
♦️ शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या समोर श्रीसूक्त सकाळ- संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते.
♦️ श्री सुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मी च्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील *कर्जाचा डोंगर* हळू हळू कमी होण्यास सुरुवात होते .
♦️माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी *शुक्रवार* खूप महत्त्वाचा सांगितलं आहे …या दिवशी सकाळी ५:३० ते ६ :३० आणि *संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30* या काळात शुचिर्भूत होऊन श्रीसूक्त पठण केल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होतात.
♦️आपल्या घरातील *कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक* असतात त्यावर रोज श्रीसूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो.
♦️ आपल्याकडे कुलधर्म – कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते.
♦️ *नवरात्रात* श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठण केल्यास धन-धान्य , सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते .
♦️ श्रीसूक्त स्तोत्राचे पठण *उत्तर दिशेला तोंड करून* पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते …कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे.
♦️ श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या *कुंडलीतील अशुभ ग्रहांचे* आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात.
♦️ ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे ..सर्वकाही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही , लक्ष्मी स्थिर राहत नाही अश्या व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्रीसूक्ताचे 11 वेळेस पठण करून त्यांचे *शुद्ध तुपाने होमहवन करावे* .त्याने लक्ष्मी स्थिर राहते.
♦️श्रीविष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त 16 वेळेस आणि विष्णुसहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते.
💥🌹शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मी चा वास असतो.🙏🍁संग्रहक – वे.श्री ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर .