vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धती आर्यादुर्गा देवीच्या उपासना मध्ये सप्तशती पाठाचे महत्व अनन्य साधारण आहे म्हणून ज्या आर्यादुर्गा देवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती ..

दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धती
आर्यादुर्गा देवीच्या उपासना मध्ये सप्तशती पाठाचे महत्व अनन्य साधारण आहे म्हणून ज्या आर्यादुर्गा देवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती…

अध्यात्मिक वार्ता-:

पाठाची पूर्वतयारी:
श्रीदुर्गासप्तशती हा आपला एक प्राचीन ग्रंथ आहे. सांप्रत कलीयुगामध्ये चण्डी व विनायक म्हणजे श्रीदुर्गादेवी व श्रीगणेश यांची उपासना शीघ्र फलदायी होते असे एक संस्कृत वचन आहे. (कलौचण्डी विनायकौ).

श्रीदुर्गासत्पशती हा ग्रंथ मार्कंडेय पुरांणातील आहे. मार्कंडेय ऋषीनी हे देवीमाहात्म्य संस्कृतमध्ये ७०० सातशे श्र्लोकांत सांगितले आहे. हे सातशे श्र्लोक असल्याने ह्या ग्रंथाचे नांव सप्तशती असे आहे. उपासना पद्धतीमध्ये ह्याचे पाठ करणे, नवार्ण मंत्र जप व हवन ह्या मुख्य गोष्टी आहेत. या ग्रंथाचे एकंदर १३ तेरा अध्याय आहेत. या तेरा अध्यायांत श्रीदेवीच्या महत्वाच्या तीन अवतारांचे संक्षीप्त वर्णन आहे.

पहिल्या अध्यायांत श्रीमहाकाली अवतार. दोन, तीन व चार या अध्यायांत श्रीमहालक्ष्मी आणि
पांच ते तेरा या नऊ अध्यायांत श्रीमहासरस्वती या तीन अवतारांच्या युद्धाचे व त्यांनी संहार केलेल्या राक्षसांचे वर्णन आहे. आपण पाठ करतांना देवी अवतारांची उत्पत्ती व त्यांचे कार्य एवढीच माहिती वाचतो म्हणजेच देवीचे अर्ध चरित्र वाचतो म्हणून पाठाच्या अंती देव्यपराधक्षमापन स्तोत्र म्हणण्याचा प्रघात आहे. कांही उपासक आपल्याकडून कांही चुका होतील म्हणून पाठ करण्यास घाबरतात. वरील स्तोत्र म्हंटल्याने पाठ करतांना कांही चुका झाल्यास देवी आपल्याला क्षमा करते .

श्रीदुर्गादेवीची उपासना म्हणजे सप्तशतीचे पाठ करणे ही उपास्य देवतेला व उपासकाला म्हणजेच देवीला व भक्ताला आवडणारी अशी व भक्ताला सर्व संकटांतून मुक्त करणारी, अभिष्ट, इच्छित गोष्टींची प्राप्ती लवकर करुन देणारी अशी उपासना आहे. अर्थातच हे सप्तशतीचे पाठ करातांना काहीं नियम, आवश्यक तंत्रे सांभाळावी लागतात. तसे केल्यास अपेक्षित फळ लवकर मिळते असा बर्‍याच उपासकांचा अनुभव आहे.
सर्व सामान्यपणे श्रीदुर्गासप्तशतीचा पाठ एका दिवसांत खालिलप्रमाणे करतात.

श्रीदुर्गासप्तशतीपाठाचे वाचन:

१) देव्याः कवच, अर्गला स्तोत्रम्, कीलक, वेदोक्त रात्रिसूक्त, तन्त्रोक्त रात्रिसूक्त, श्रीदेवी अथर्वशीर्ष, नवार्णमंत्र जप, सप्तशतीन्यास.२) नंतर अध्याय १ ते १३. सर्व अध्याय वाचुन झाल्यावर, वेदोक्त रात्रिसूक्त, तन्त्रोक्त रात्रिसूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिकरहस्य, मूर्तिरहस्य, क्षमाप्रार्थना, देव्यपराधक्षमापन स्तोत्र1 दहा पाठ करून एक पाठ हवन केल्यास दुर्गा सप्तशती पाठ संपन्न होतो
2) दहा दिवसात शंबर पाठ करून रोज एक पाठ हवन केल्यास शतचंडी संपन्न होतो.
3) एक हजार पाठ करून शंबर पाठाचे हवन केल्यास सहश्रचंडी संपन्न होतो
4) दहा हजार पाठ करून एक हजार पाठाचे हवन केल्यास आयुतचंडी संपन्न होतो
अशा प्रकारे पाठ करावा. वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पाठ चालू असताना करावे. पाठ झाल्यावर होमहवन करावे. अनुष्ठान म्हणून ब्राह्मण, कुमारिका, सुवासिनींना भोजन-दक्षिणा द्यावी.

फलश्रुती
पाठ केल्यामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे, पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात.

देवीने सांगितलेले महत्व
या पाठाचे महत्व व फलश्रुती स्वतः देवीने बाराव्या अध्यायांत ऋषींना सांगितली आहे. खरतर हा संपूर्ण बारावा अध्याय हा स्वतः देवीने सांगितला असून बहुतांश यांत फलश्रुती आहे. त्यांतील कांही संस्कृतमधिल निवडक श्र्लोक खालिलप्रमाणे आहेत.

सर्वं ममैतन्माहात्म्यं मम सन्निधिकारकम् । पशुपुष्पार्घ्यधूपैश्च गन्धदीपैस्तथोत्तमैः ॥ १२/२०॥
विप्राणां भोजनैर्होमैः प्रोक्षणीयैरहर्निशम् । अन्यैश्च विविधैर्भोगैः प्रदानैतवत्सरेण या ॥ २१ ॥
प्रीतिर्मे क्रियते सास्मिन् सकृत्सुचरिते श्रुते । श्रुतं हरति पापानि तथाऽऽरोग्यं प्रयच्छति ॥ १२/२२ ॥
मराठी अर्थः
देवी म्हणते हे माझे माहात्म्य माझी समिपता मिळवून देणारे आहे. पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, गंध, दीप आदि उत्कृष्ट साहित्याने मासी पूजा करणे, (कुमारिका, सुवासिनी,) ब्राह्मणांना भोजन देणे, होमहवन करणे, प्रोक्षण, अभिषेक करणे, निरनिराळ्या प्रकारचे भोग, नैवेद्यादि अर्पण करणे, दाने देणे, याप्रकारे वर्षभर माझी उपासना केली असता मला जसा आनंद होतो तसाच आनंद या माझ्या चरित्राची एकदा आठवण केल्यानेही मला होतो. हे स्मरण भक्तांची सर्व पापें हरण करणारे व त्यांना आरोग्य देणारे आहे.

अशा रीतीने श्रीदुर्गासप्तशती हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीदुर्गासप्तशती ग्रंथाच्या पाठाने देवीभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्रीजगदंबेच्या चरणी प्रार्थना.🌷 वे. श्री.ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री) सोलापूर.🌷 साभार

संबंधित पोस्ट

सोन्नलगी ‘ आजचे सोलापूर शहर , म्हणजे आमचं शहर. या शहरात कोणी ही उपाशी पोटी झोपत नाही अशी या शहराची महिमा आणि अनुभव आहे. याला कारण म्हणजे हे शहर ज्यानीं वसवले ते येथील आमचे ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज !!

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारी निमित्त: पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दिवे आणि बोपदेव घाट तीन दिवस बंद…

मानवाला एकत्वाच्या सूत्रात गुंफणारा – मानव एकता दिवस व्यापक देशव्यापी रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात-ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा..

श्री स्वामी समर्थ🌹

vishwatmaklokswamivarta