vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परिक्षा जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात येणार असून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 बैठक (दि.30 ऑक्टोबर 2025) रोजी पार पडली.

या समितीच्या सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथ), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग श्रीम.ललिता दहितुले यांनी परिक्षेची बैठक व्यवस्था पोलिस बंदोबस्त,कस्टडी रुम (प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका व स्वाक्षरीपट ठेवण्यासाठी), जिल्हा नियंत्रण कक्ष, परीक्षा केंद्र, अधिकारी/कर्मचारी नेमणूका, वाहन व्यवस्था, व्हिडीओ चित्रीकरण, भरारी पथक याबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती यांनी या परिक्षेचे आयोजन व संनियंत्रण करताना सर्व यंत्राणांनी अतिशय दक्षतेने काम करणेबाबत सूचना दिल्या

ही परीक्षा पनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार असून, परीक्षा दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळ सत्र पेपर 1 – 10.30 ते दु. 1.00 या वेळेत व दुपार सत्र पेपर 2 – दु.2.30 ते 5.00 या कालावधीत होणार आहेत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक, सेक्टर 1 ई, सिडको कॉलनी, कळंबोली मॅकडोनाल्डच्या पाठीमागे, पनवेल येथे सकाळ सत्र स. 10.30 ते दु. 1.00 या कालावधीत पेपर -1 साठी 872 परिक्षार्थी व दुपार सत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 872 परिक्षार्थी

चांगु काना ठाकुर विद्यालय, जनार्दन भगत मार्ग प्लॉट न.8 सेक्टर-14, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे पेपर -1 साठी 546 परिक्षार्थी व दुपार सत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 546 परिक्षार्थी.के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, सेक्टर 18, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे सकाळ सत्र स.10.30 ते दु.1.00 या कालावधीत पेपर साठी 840 परिक्षार्थी व दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 830 परिक्षार्थी. सेंट जोसेफ माध्यमिक विद्यालय, प्लॉट नं. 9, सेक्टर 7, नवीन पनवेल (पू) येथे सकाळ सत्र स.10.30 ते दु.1.00 या कालावधीत पेपर 1 साठी 257 परिक्षार्थी व दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 480 परिक्षार्थी.

 को.ए.सो. के.व्हि. कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सावरकर चौक, वडाळे तलाव, जुने पनवेल येथे दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 426 परिक्षार्थी. को.ए.सो. व्हि. के. विद्यालय, वडाळे तलाव, जुने पनवेल येथे दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 305 परिक्षार्थी परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तरे- नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीशकुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड तर उद्या दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील.

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

vishwatmaklokswamivarta