vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील प्रभाग क्र. १ मधील प्रियदर्शन कॉलनी येथे असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात मागील ३५ वर्षांपासून चालत आलेली अन्नकूट प्रसादाची परंपरा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या स्वयंप्रेरणेने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अन्नकूट प्रसाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित राहून महाआरती केली आणि भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.

भास्कर आबा दानवे बोलताना म्हणाले की, “प्रियदर्शनी कॉलनीतील संकटमोचन हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे भक्तिभावाने अन्नकूट प्रसादाची परंपरा जपली जाते. ही परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. अशी संस्कारमूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी आयोजक मंडळाचे कौतुक करत ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, कल्याण भदनेकर, प्रभागातील दिलीप शर्मा, अजित मानधनी, कैलास अग्रवाल, पालवे सर, शिवम यादव, किशोर आगलावे यांसह महिलांमध्ये शारदा काबरा, कमल मंत्री, मंगला मानेगावकर, मीना मित्तल, शोभा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.अन्नकूट प्रसादासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक, बालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात “जय हनुमान” च्या घोषणांनी धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित पोस्ट

टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

आपत्कालीन भारनियमनाने नागरिकांना त्रास नको; पूर्वसूचना द्या – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta