vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)-जिल्ह्यातील ज्या नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे, त्याक्षेत्रातील शस्त्रपरवानाधारक ८८ पैकी ७६ जणांना २४ तासांत आपली शस्त्रे नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहिता सुरु असलेल्या सहा नगरपालिका व एक नगरपंचायत क्षेत्रात एकूण ८८ व्यक्ती शस्त्रपरवानाधारक आहेत. त्यापैकी ७६ लोकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्य १२ व्यक्तित ज्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य म्हणून शस्त्र बाळगावे लागते त्यांचा समावेश आहे. तरी या ७६ व्यक्तिंनी दि.१५ रोजी मध्यरात्री १२ वा. पर्यंत आपल्याकडील शस्त्र नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करावे,असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून शस्त्र जमा केले जात आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन