vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

रायगड–अलिबाग, प्रतिनिधी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भालीवडी (ता. कर्जत) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत जिल्हास्तरीय जनजाती गौरव दिवस कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी समाजासाठीच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.

जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून प्रकल्पामार्फत सात नवीन बहुउद्देशीय केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. रोहा तालुक्यातील लांढर आदिवासी वाडी येथील केंद्राचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते झाले. या केंद्रांद्वारे आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक सक्षमीकरण व शासकीय योजना गावागावात पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आश्रमशाळेतील विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आदिवासी नृत्य, गीत आणि संस्कृतिक कला सादर केले.

MPSC परीक्षेत यश मिळवून रायगडचा गौरव वाढविणाऱ्या नयन वाघ यांचा जिल्हाधिकारी जावळे व प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या गावी सुरू असलेल्या पोलीस भरती अकॅडमीसाठी 10 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे संच प्रदान करण्यात आले.

००००

संबंधित पोस्ट

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये जप्त केलेली ६८,३८,६३५ रुपयांची मालमत्ता मालकांना परत करण्यात आली.

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था