vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी काळा किल्ला डेपोतून सुटणाऱ्या बसेस दहा मिनिटाच्या अंतराने सोडण्याची ज्येष्ठांची मागणी

धारावी काळा किल्ला डेपोतून सुटणाऱ्या बसेस दहा मिनिटाच्या अंतराने सोडण्याची ज्येष्ठांची मागणी

मुंबई प्रतिनिधी-: फेस कॉम संलग्न हॅपिनेस्ट ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व झेंडा ग्रुप ऑफ धारावी यांनी एका संयुक्त निवेदनात ज्येष्ठांच्या सह्यांचे निवेदन बेस्ट व्यवस्थापक काळा किल्ला धारावी डेपो व महाव्यवस्थापक बेस्ट हाऊस कुलाबा येथे विनंती वजा मागणी निवेदन सादर केले आहे त्यामध्ये धारावी काळा किल्ला बस आग्रा मधून सुटणाऱ्या बस सेवा क्रमांक 52 46 164 176 सी 72 तसेच 305 312 463 या बसेस खूप उपयुक्त व प्रवासी सेवेला तसेच बेस्ट उपक्रमाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी लाभदाय ठरत आहे पण या बस सेवा वेळेवर नसल्यामुळे त्याचा तोटा बस प्रवाशांना तर होतो आणि लाभ मात्र खाजगी वाहनाने वाहतूकदारांना होत असतो त्याचे मुख्य कारण बेस्ट व्यवस्थापकडे बसेस ताफा कमी असल्यामुळे आणि बेस्ट ने सुरू केलेल्या खाजगी वाहतुकीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे व इतर प्रवाशांचे नुकसान तर होतेच बेस्टचे नियोजन बिघडल्याने नाहक त्रास बस प्रवाशांना सोसावा लागतो त्यामुळे कामाच्या व गर्दीच्या वेळी अपुऱ्या व उशिरा येणाऱ्या बस सेवा क्रमांक 52 46 164 176 सी 72 धारावी डेपो टी जंक्शन मार्गे माहीम कडे जाणाऱ्या आणि धारावी डेपोकडून 90 फीट मार्गे बस सेवा क्रमांक ३०५ ४६३ ३१२ १७६ याही गाड्यांची ती स्थिती आहे त्यामुळे बस प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला शाळा कॉलेज विद्यार्थी व श्रमिक कामगार यांच्यामध्ये बेस्ट उपक्रमाबद्दल तीव्र नाराजी आहे येत्या काही दिवसात वरील सर्व मार्गाचे नियोजन व व्यवस्थापन तसेच बस ताफ्यामध्ये वाढ न केल्यास लवकरच लोकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल असा इशारा हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर आणि झेंडा ग्रुप धारावी यांचे प्रतिनिधी परशुराम जाधव विष्णू कटके यांनी दिला आहे कृपया बेस्ट प्रशासन याची दखल घेईल ही अपेक्षा

संबंधित पोस्ट

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

राष्ट्रवादी (श.प.) ने काढला लाटणे मोर्चा थाळीनाद करीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध  महागाई विरोधात एल्गार.

vishwatmaklokswamivarta

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथील आंदोलनात जोरदार मागणी वरळी म्युझिक कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ‘सनबर्न’ व प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला…