vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा सैनिक संकुलात स्पर्श प्रणाली मेळावा, आजही कामकाज सुरू राहणार

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा सैनिक संकुलात स्पर्श प्रणाली मेळावा, आजही कामकाज सुरू राहणार

सांगली, प्रतिनिधी : सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या SPARSH (SYSTEM FOR PENSION ADMINISTATION RAKSHA) प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

रक्षा लेखा नियंत्रक दक्षिण कमान पुणे आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्पर्श प्रणाली पेन्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा सैनिक संकुल येथे आयोजित या पेन्शन मेळाव्यास यावेळी रक्षा लेखा विभाग PCDA(SC) पुणेच्या उपनियंत्रक स्वाती सुर्वे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त), विंग कमांडर प्रकाश नवले, शौर्य चक्र, ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवाडकर, माजी कॅप्टन सुनील गोडबोले, कॅप्टन (IN) संजय जाधव आदि उपस्थित होते.

स्पर्श प्रणालीचे महत्व, उपयुक्तता आणि पारदर्शकता याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्पर्श प्रणाली पेन्शन धारकांना फक्त सुविधाच देत नाही तर वेळेवर सेवाही प्रदान करते. या मोहिमे अंतर्गत पेन्शन धारकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असे ते म्हणाले.

यावेळी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी स्पर्श प्रणालीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते दहा वरिष्ठ रक्षा पेन्शनर यांना सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते अमर जवान स्मारकास पुष्प चक्र अर्पण करण्यात आले. द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात आली. प्रास्ताविक श्रीमती स्वाती सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन नेहा सोनेवाल यांनी केले.

कार्यक्रमस्थळी पेन्शन धारकांना मदत करण्यासाठी विविध सुविधा टेबल उपलब्ध करून दिलेले होते. ज्यात स्वागत नोंदणी, हेल्प डेस्क, डिजीटल जीवन प्रमाणपत्र, पीएसआर (PROFILE SERVICE REQUEST), फेस ऑथेंटिकेशन काऊंटर आदिंचा समावेश होता.

कार्यक्रमास अजय चंदोरे, जयंत पोतदार, अशोक कुमार लाल दास यांच्यासह अन्य सहाय्यक लेखाधिकारी, लेखा परीक्षक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक तथा माजी सैनिकांच्या पत्नी व अवलंबीत आदि उपस्थित होते. या मेळाव्यांतर्गत 18 नोव्हेंबर 2025 रोजीही सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हा सैनिक संकुल, सांगली येथे कामकाज केले जाणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजी महाराष्ट्र दौऱ्यावरपंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक होणार

आदि शंकराचार्यकृत गणेश पंचरत्न!लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट!मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण!

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनचे कामकाज शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच* 

राजेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील…

vishwatmaklokswamivarta