vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विज्ञानविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांचा ज्ञानसंपन्न उत्साही सहभाग…

विज्ञानविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांचा ज्ञानसंपन्न उत्साही सहभाग…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी-   विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा व त्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि यामधून भविष्यामध्ये वैज्ञानिक निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे महानगरपालिका संचलित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘प्रश्नमंजुषा’ हा स्पर्धात्मक उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

            या उपक्रमामध्ये प्राथमिक विभागात इयत्ता सहावी, सातवी व आठवी या इयत्तेमधील प्रत्येकी एक अशा तीन विद्यार्थ्यांचा प्रत्येक शाळेचा एक समुह संघ स्वरूपात तयार करण्यात आला. यामध्ये 28 प्राथमिक शाळांच्या तीन विद्यार्थीय संघांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होत विज्ञानविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे दिली.

            त्याचप्रमाणे इयत्ता नववी व दहावी अशा दोन इयत्तांमधील प्रत्येकी एक अशा दोन विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेचा एक समुह तयार करण्यात आला होता.

            प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या सुरूवातीला आधी माध्यमिक विभागाचा प्रश्नमंजुषा स्पर्धा हा उपक्रम घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक विभागाचा प्रश्नमंजुषा स्पर्धा हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात एकूण 40 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकारातून वैदिक विश्व ह्युमॅनिटी कल्चरल अँड वेल्फेअर या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. सहभागी झालेल्या प्राथमिक, माध्यमिक अशा दोन्ही विभागांतील सर्व स्पर्धकांना शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे तसेच उपायुक्त श्रीम. ललिता बाबर आणि डॉ.सुरेश गंगोत्रा, डॉ.योजना सिंग यांच्या शुभहस्ते प्र गौरविण्यात आले.

            विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन तसेच प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे प्रथम क्रमांक संपादन केलेल्या प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून लॅपटॉप देण्यात आला तसेच काही विद्यार्थ्यांना अचूक उत्तरे दिल्याबद्दल विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. एकंदरीत विज्ञान विषयक हा उपक्रम विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला.

0000

संबंधित पोस्ट

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

विधान परिषद प्रश्नोत्तरे :उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी- मंत्री उदय सामंत

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे