vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सातारा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. अद्याप ज्या कारखान्यांनी ऊस दर जाहिर केलेला नाही त्यांनी आपला दर तातडीने जाहीर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व शेतकरी संघटना यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हा निबंधक संजय सुद्रिक, प्रादेशिक उपसंचालक (साखर) प्रशांत सुर्यवंशी, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) अजय देशमुख, सदाशिव गोसावी यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी नियमांचे पालन करावे, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावावा. कारखान्यांकडील वजन काट्याची काटेकोर तपासणी करावी. ऊस तोड कामगार ऊस तोडीचे अतिरिक्त पैसे मागत असल्यास कारखान्यांकडे तक्रारी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सभेत केल्या.

कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बु. ता कराड, जयवंत शुगर्स धावरवाडी ता. कराड , सह्याद्री साखर कारखाना यशवंत नगर, ता. कराड 3 हजार 500 रुपये , ग्रीन पॉवर शुगर्स गोपुज ता. खटाव 3 हजार 300, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर ता. पाटण 3 हजार रुपये सभेपुर्वी कारखान्यांनी दर निश्चित केले होते हेच दर अंतिम करण्यात येणार असल्याचे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सभेत सांगितले.तर अथनी शुगर्स, शेवाळेवाडी ता. कराड, शिवनेरी शुगर्स जयपुर ता. कोरेगाव, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर शेंद्रे, सातारा, जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव ता. कोरेगाव यांनी 3 हजार 500 रुपये कल्लापा अण्णा आवाडे (लि श्रीराम सहकारी साखर कारखाना) फलटण 3 हजार 10, खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ ता. खटाव 3 हजार 300 या कारखान्यांनी हा दर सभेत जाहीर केला.

शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज कापशी ता. फलटण, श्री. दत्त इंडिया साखरवाडी ता. फलटण, किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज ता. वाई, खंडाळा शेतकारी सहकारी साखर कारखाना, खंडाळा, प्रतापगड (भागीदारी तत्वावर अजिंक्य सहकारी ) सहकारी साखर कारखाना कुडाळ ता. जावली व स्वराज ग्रीनपॉवर अँड फ्युएल लि. उपळे ता. फलटण या साखर कारखांनी अद्यापर्यंत ऊस दर जाहिर केला नाही तरी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सभेत दिले.

0000

संबंधित पोस्ट

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

नक्शा’ प्रकल्पः कन्नड येथे ड्रोन सर्व्हेक्षणास प्रारंभ मालमत्तेच्या अधिकृत दस्तऐवजामुळे भवितव्य सुकर- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…