vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात ­सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

     मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडले जात आहेत.   शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व मधून मुंबईत राबवण्यात आलेल्या ‘सुविधा केंद्र’ उपक्रम एक आदर्श मॉडेल ठरत आहे.

     हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त भागीदारीत सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीत मोठे परिणाम साधले आहेत. सध्या मुंबईत २३ केंद्रे कार्यरत असून, लवकरच २४ वे केंद्र सुरू होणार आहे. मुंबईत आणखी २ केंद्रे बांधकामाधीन असून ७ केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही योजना पुढील काही वर्षांत अधिक विस्तारणार आहे.

    शहरातील झोपडपट्टी आणि वंचित वस्त्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा देण्याचे उद्दिष्ट या केंद्रांमागे आहे. ५.५ लाख नागरिकांना आतापर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ झाला असून, आरोग्यदृष्ट्या देखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

    सुविधा केंद्रे ही स्वच्छतेच्या शाश्वत व्यवस्थेची महत्त्वपूर्ण कडी आहेत. पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेसाठी ही मदत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात आणखी सुविधा केंद्रे सुरू करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरात स्वच्छता ही केवळ सोयीची बाब नाही, तर सन्मानाचा प्रश्न आहे. ‘सुविधा केंद्र’ मॉडेलने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उत्तम काम कसे होते याचे उदाहरण निर्माण केले आहे. हे केंद्रे शहराच्या आरोग्यसुरक्षेत मोठे योगदान देत आहेत. या सुविधा सेंटरमध्ये उत्तम सुविधा, लोकांचा सहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरण टिकाव आणि कार्यक्षम संचालन यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असून शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते. नागरिकांनी केंद्रांचा सक्रिय वापर करावा.”

संबंधित पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारताच्या परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादन करावे – आमदार विलास तरे

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta