vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी प्रा.श्रीरंजन आवटे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी प्रा.श्रीरंजन आवटे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते प्रा.श्रीरंजन आवटे यांनी ‘नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले संविधानातील मूलभूत हक्क’ या विषयावरील उद् बोधक व्याख्यानातून ‘भारतीय संविधानाचा आत्मा’ म्हणून बाबासाहेबांनी संबोधलेल्या संविधानातील 22 विभागांपैकी तिसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील कलम 12 ते 35 उलगडून सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले बाबासाहेबांचे अप्रतिम स्मारक पाहून मी भारावून गेलो असे सांगत प्रा. श्रीरंजन आवटे यांनी स्मारकातील विविध दालनांना भेटी देताना टाईम मशीनमध्ये बसून बाबासाहेबांसोबत चालतोय असा अनुभव आल्याचे कथन केले. शिक्षण विभागाच्या उपायुक्त तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रमुख श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी महानगरपालिकेच्या वतीने व्याख्यात्यांचे स्वागत केले. याप्रसंगी स्मारकाच्या सल्लागार श्रीम. संध्या अंबादे उपस्थित होत्या.

    आपल्या व्याख्यानामध्ये प्रा.श्रीरंजन आवटे यांनी संविधानाची निर्मिती ही तीन ते चार वर्षात झाली असली तरी त्या पाठीमागे 150 हून अधिक वर्षांची परंपरा असल्याचे सांगत, संविधानात अशी चिरंतन मूल्ये आहेत जी पुसता येणार नाहीत असे मत व्यक्त केले. ‘उद्देशिका ही संविधानाचे ओळखपत्र’ या नाना पालखीवाला यांच्या विधानाचा उल्लेख करीत ‘समाजाचा जीपीएस स्वप्न नकाशा’ म्हणजे संविधान असा वेगळा विचार त्यांनी मांडला. उद्देशिका समजली की भारतीय संविधानाचे व्याकरण समजते असे सांगताना भारतातील लोकांनी स्वतःला हे संविधान अर्पण केले आहे त्यामुळे लोकांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले.

    काय नाकारायचे हे बाबासाहेबांनी सांगितलेच त्यासोबतच काय स्वीकारायचे हे पण त्यांनी सांगितले. विषमतेला नकार व समतेला होकार हे बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेत नाही म्हणून पुन्हा पुन्हा संविधान समजून घेण्याची गरज भासते असे मत प्रा.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले

    इतिहासातील विविध दाखले देत, संविधानातील मूल्यांची वेगवेगळ्या उदाहरणांतून मांडणी करत संविधानातील विविध कलमांच्या पाठांतरापेक्षा त्या पाठीमागचा आशय समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने संविधानातील मूलभूत हक्काविषयी 12 ते 35 कलमांच्या माहितीची उदाहरणासहित मांडणी त्यांनी केली. संविधानाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आज व्याख्यानातून मिळाला अशी प्रतिक्रिया याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांनी दिली

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला 30 ता स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पा लालबागचा राजा यांचा घरोघरी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रसाद पोहोचवणार जिओ मार्ट आणि पेटीएम च्या माध्यमातून