vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना  आमदार भास्कर जाधव  यांनी पलटवार केला

..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना  आमदार भास्कर जाधव  यांनी पलटवार केला

[ मुंबई : प्रतिनिधी  : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बवरून शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी पलटवार केला आहे. विकासकामांत अडथळा या मुद्द्यावरून गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र गडकरी यांच्याच पक्षाच्या सिंधुदुर्गातील एका आमदाराने अधिकाऱ्यावर चिखलफेक केली होती. ती त्यांना चालते का असा सवाल, नितेश राणे यांचे नाव न घेता भास्कर जाधव यांनी केला.

शिवसेनेच्या दहशतीमुळे महामार्गांची कामं बंद आहेत. वाशिम जिल्ह्यात लोकप्रतिनिधींचे कामात अडथळे आणत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात, पुलगाव -सिंदखेडराजा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरु आहे. वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणच काम पूर्णत्वास गेले आहे. रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराकडून काम सुरु आहे. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून यंत्रसामुग्रीची जाळपोळ केल्याने कंत्राटदारांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात दहशत. त्यामुळे ते काम पुन्हा बंद आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासकामात आडकाठी आणतायेत, अशा आशयाचं तक्रार करणारं पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. राज्यातील महामार्गांच्या कामावरुन गडकरींचे आरोप जिव्हारी लागल्यानं शिवसेना नेत्यांनी सारवासारव सुरू केली. या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेचे कान टोचलेत.

दरम्यान, आम्ही शेतकरी हितासाठी भांडलो, रस्त्याच्या कामात आडकाठी आणण्यासाठी नव्हे, अशा शब्दांत वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तर महामार्गाच्या कामात शिवसेनेने कुठेही अडथळा निर्माण केला नाही. गडकरी यांना पत्र लिहून तसे कळवणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री, राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर

vishwatmaklokswamivarta

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – एआय तंत्राचाही वापर , नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातले 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावावर आहेत का? सरपंच उत्तर देत म्हणाले… कोर्लई गावाचे सरपंच

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त वाहनासह १४ लाख २८ हजार रुपये मूल्य

vishwatmaklokswamivarta

आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएमची बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद

vishwatmaklokswamivarta

मतमोजणी केंद्रावरील सुविधा निर्मितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..