
मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर च्या मुलासाठी धाव.
मुंबई प्रतिनिधी: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतण्या रिजवन कासकरने जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने २०१९ मध्ये रिजवानला एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रिजवान हा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा आहे. रिजवनने याचिकेत मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने दाखल केलेला गुन्हा हा चुकिचा आहे. या गुन्ह्यांशी त्याचा काहीही संबध नसल्याचं त्याचं म्हणण आहे. या याचिकेवर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण हवलाचा मास्टर माइंड अहमद रजा वडारिया याच्या अटकेनंतर पुढे आला. वडारिया हा कुख्यात गुंड आणि दाऊदचा उजवा हात छोटा शकिलचा जवळचा हस्तक आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार अश्फाकची एका व्यापार्यासोबत पैशावरून वाद सुरू होता. हा वाद चायनातून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीकरून तो भारतात विकण्याचा व्यवसायातून झाला होता. अश्फाकला त्या व्यापार्याला १५ लाखरुपये देनं होतं. जे पैसे त्याला द्यायचे नव्हते. म्हणूनच अश्फाकने वडारियाला मध्यस्थि घेतले. त्यानंतर व्यापारयाला १२ जून २०१९ ला व्यावसायिकला इंटरनॅशनल नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्याची ओळख फहीम मचमच अशी सांगितली होती. त्याने ते पैसे जमा केल्याचे सांगत पैसे न मागण्याबाबत दोन ते तीन वेळा धमकावले.



