vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक एड्स दिन विविध उपकमांनी साजरा

जागतिक एड्स दिन विविध उपकमांनी साजरा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात आले. दि.१५ पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी कळविले आहे.

जिल्हा रुग्णालयात आज सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा सायकल संघटना, तेज्स्विनी सायकल क्लब, देवगिरी सायकलिंग क्लब आदी संस्था सहभागी झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली मार्गस्थ करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. भुषणकुमार रामटेके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण सावरगावेकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. पद्मजा सराफ, डॉ.प्रशांत बडे, डॉ. अपर्णा जक्कल, डॉ. मनिष भोंडवे, क्षयरोग अधिकारी डॉ. एम.टी.साळवे, डॉ. पंडीत किल्लारीकर, डॉ. दीपमाला परदेशी, श्रीमती साधना गंगावणे, , जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार, जिल्हा पर्यवेक्षक विनोद मस्के, पंकज धुळे आदी उपस्थित होते.

 डॉ.सकपाळ यांनी बाबा हिंदुस्थानी पथनाट्यातून जनजागृती केली. यावेळी एचआयव्ही, एड्स औषधोपचार सुविधा, सेवा देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्य एआरटी केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी सुत्रसंचालन सुनिता बनकर यांनी तर आभारप्रदर्शन सिताराम विधाते यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

जालना रेल्वे स्थानकावर अनधिकृत सजावट प्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला विविध विभागांचा जिल्हास्तरीय आढावा..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान देशभरातील ८२ शिक्षक सन्मानित

vishwatmaklokswamivarta