vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान..

राज्य प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायतीच्या सर्व जागांचे मतदान, तसेच उदगीर शहरातील तीन जागांचे मतदान पुढे ढकलण्यात आले असून ते सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे.

उदगीर नगरपरिषदेमध्ये २० प्रभागांमध्ये ९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी एकूण ११० मतदान पथके आणि १४ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १२१ कंट्रोल युनिट आणि २४२ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नगरपरिषदेत ८३ हजार १७९ मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग क्रमांक १५ ब आणि प्रभाग क्रमांक १६ ब या तीन सदस्यपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ३७ सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे.

अहमदपूर नगरपरिषदेमध्ये ४४ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी ४९ मतदान पथके आणि ८ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२ प्रभागांमधील २५ सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार आहे. ३७ हजार ६९६ मतदार यामध्ये आपला हक्क बजावतील. यासाठी ६१ कंट्रोल युनिट आणि १२२ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

औसा नगरपरिषदेमध्ये ११ प्रभागातील २३ सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. यासाठी ५१ कंट्रोल युनिट आणि १०२ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तसेच ५० मतदान पथके आणि ५ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी ३२ हजार ३२० मतदार मतदानाचा अधिकार बजाविणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर,नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार अहमदपूर, औसा व उदगीर या मतदारसंघात ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. तसेच या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांनाही सुट्टी लागू राहील. नगरपरिषद क्षेत्रातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

 

तिन्ही नगरपरिषद क्षेत्रातील मद्यविक्री राहणार बंद,उदगीर, अहमदपूर, आणि औसा या तीन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर,२०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानादिवशी या तिन्ही नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, १९४९ व महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम १९६९ च्या संबंधित कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

*****

संबंधित पोस्ट

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा