vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५जिल्ह्यात एकूण ७०.२६ टक्के मतदान १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५जिल्ह्यात एकूण ७०.२६ टक्के मतदान १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

 

रायगड- अलिबाग, प्रतिनिधी-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत ७०.२६ टक्के मतदान झाले.जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार १ लाख १९ हजार ७८ तर स्त्री मतदार १ लाख १८ हजार ४२३ असे एकूण २ लाख ३७ हजार ५०३ मतदार होते.

१ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी मतदान केले. ८३ हजार ९८६ पुरुष मतदार, ८२ हजार ८७१ स्त्री मतदारांनी मतदान केले.  कर्जत येथे १० हजार ९५३ पुरुष, १० हजार ७२७ स्त्री मतदार असे एकूण २१ हजार ६८० मतदारांनी मतदान केले असून ७२.३७ टक्के मतदान झाले.अलिबाग येथे ५ हजार ८५३ पुरुष, ५ हजार ६४५ स्त्री मतदार असे एकूण ११ हजार ४९८ मतदारांनी मतदान केले असून ७०.३१ टक्के मतदान झाले.

माथेरान येथे १ हजार ६२१ पुरुष, १ हजार ८४० स्त्री मतदार असे एकूण ३ हजार ४६१ मतदारांनी मतदान केले असून ८५.३५ टक्के मतदान झाले.मुरुड जंजिरा येथे ४ हजार २६ पुरुष, ४ हजार ५०४ स्त्री मतदार असे एकूण ८ हजार ५३० मतदारांनी मतदान केले असून ७३.८९ टक्के मतदान झाले.

श्रीवर्धन येथे ४ हजार १८७ पुरुष, ४ हजार १९२ स्त्री मतदार असे एकूण ८ हजार ३७० मतदारांनी मतदान केले असून ६६.२३ टक्के मतदान झाले.खोपोली येथे २१ हजार ६७० पुरुष,२० हजार ८६४ स्त्री मतदार असे एकूण ४२ हजार ५३५ मतदारांनी मतदान केले असून ६८.५२ टक्के मतदान झाले.उरण येथे ९ हजार १३३ पुरुष, ८ हजार ६७२ स्त्री मतदार असे एकूण १७ हजार ८०५ मतदारांनी मतदान केले असून ६७.९२ टक्के मतदान झाले.

पेण येथे १२ हजार २१६ पुरुष, ११ हजार ६२९ स्त्री मतदार असे एकूण २३ हजार ८४५ मतदारांनी मतदान केले असून ७०.३९ टक्के मतदान झाले.महाड येथे ८ हजार १६६ पुरुष, ८ हजार २६० स्त्री मतदार असे एकूण १६ हजार ४२६ मतदारांनी मतदान केले असून ७१.०३ टक्के मतदान झाले.

रोहा येथे ६ हजार १७० पुरुष, ६ हजार ५३८ स्त्री मतदार असे एकूण १२ हजार ७०८ मतदारांनी मतदान केले असून ७१.९२ टक्के मतदान झाले.

००००

संबंधित पोस्ट

राजधानीत सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार*मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रांमधून आता ५०० हून अधिक शासकीय सेवा उपलब्ध-सर्व केंद्रे अद्ययावत करण्याचे सीईओ मेघना कावली यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta